अर्जुन कराळे
जिल्हा प्रतिनिधी
दीपावली पर्व सर्वत्र सुरू असताना अनेकांकडून बॅड कॉमेंट सहन करणा-या पोलिस खात्याने मेहकर यथील भिका-याच्या थैलीत सापडलेले दिड लाख रूपये त्याच्या कुटुंबीयाच्या ताब्यात देवून जगात अद्याप मायणुसकी जिवंत असल्याचा परिचय दिला आहे.
धनतेरस च्या दिवशी मेहकर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका भिका-याचा मृत्यू झाला होता. त्याच्या थैली मध्ये 1.63 लाख रूपयांची रोकड मेहकर पोलिसांना सापडली.तसेच त्याची चौकशी केली असता त्याच्या बॅंक खात्यात आणखी रक्कम असल्याचे समजले. पेलिसांनी नातेवाईकांचा शोध घेवून ती रक्कम व भिका-याचे बॅंक पासबुक त्यांच्या स्वाधीन केले.
या कामगीरीबद्दल मेहकर ठाणेदार राजेश शिंगोटे, पोलिस.निरीक्षक संदीप बिरांजे,सम्राट ब्राम्हणे,करीम शहा, राजेश उंबरकर यांच्यासह सर्व मेहकर पोलिसांचे संपूर्ण परिसरात कौतूक व अभिनंदन होत आहे.