शेगाव शहर पुलिस स्टेशनच्या डीबी पथकाने 77,600 रुपयांचा प्रतिबंधीत गुटका पकडला तिघांना घेतले ताब्यात.. गुन्हा दाखल

0
9

 

अर्जुन कराळे : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला 77 हजार 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सापळा रचून पकडला याप्रकरणी तिघा आरोपींना शहर पोलिसांच्या डिबी पथकाने ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकाडे साहेब यांना व पथकाला गुप्त माहिती मिळाली की शेगाव टाऊन मध्ये दुचाकी वर प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणण्यात येत आहे या माहितीवरून डीबी पथकातील पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकाळे साहेब व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचून प्रमोद रामेश्वर शिंगारे वय 38 वर्षे राहणार भूत बंगला परिसर शेगाव शेख लतीफ शेख मेहबूब व 44 राहणार बाजार फल शेगाव आणि प्रसाद चोपडा तळोकार व 27 वर्ष राहणार दशरथ नगर शेगाव या तिघांना थांबवून त्यांची अंग झळती घेतली असता त्यांच्या ताब्यातून प्रतिबंधित केलेला वाह पान मसाला सुपारी असेल लिहिलेले पाकीट विमल पान मसाला बोलो जुबा केसरी असे लिहिलेले पॅकेट टोबॅको असे लिहिलेले पाकीट रियल मी कंपनीचा मोबाईल स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक 28 34 आधी अंदाजे किंमत 77 हजार 623 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदर मुद्देमाल जप्त करून उपरोक्त तिघाही आरोपी विरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन प्रल्हाद वाघमारे बक्कल नंबर 742 यांच्या फिर्यादीवरून अपराध नंबर 570/2023 कलम 328 188 272 273 34 भादवी सह कलम 26 2 26 2 आय व्ही 59 अन्नसुरक्षा मानके कायदा सण 2006 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकडे साहेब करीत आहेत