संत रविदास महाराज जयंती निमित्त भव्य कार्यक्रम

0
117

शेगाव – तालुक्यातील जवळा प. येथे संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.१३ फेब्रुवारी रोजी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जवळा प.येथे संत रविदास महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. महाराज यांचे जयंतीनिमित्त मूर्ती प्रतिष्ठापना व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री संजय कुटे, खासदार प्रतापराव जाधव, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष ज्ञानदेवराव इंगळे, स्थानिक अध्यक्ष डॉ.दिनेश कळसकार, शिवदास कळसकार, कैलास कळसकार व इतर मंडळी झटत आहेत.